
पालघमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्कायामुळे कोणतीही जिवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये घबराट आहे.