
बोळिंज : विरार पूर्वेकडील विजयनगर परिसरात नुकत्याच घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. २९) दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.