

Palghar Rain
ESakal
पालघर : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, जिल्ह्यातील २००हून अधिक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. बचावकार्यासाठी मुंबईहून एनडीआरएफच्या तीन तुकड्या मागविण्यात आल्या असून, पालघरमधील दोन तुकड्यांसह विविध ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.