Palghar Hospital Ruckus: पालघरमध्ये रुग्णालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा धुडगूस; डॉक्टर-कर्मचाऱ्यांशी अरेरावी, १७ जणांविरोधात गुन्हा

Palghar Hospital Ruckus Shiv Sena Leaders Booked In Case: खासगी रुग्णालयात घुसून शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टर-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोडीच्या धमक्या; सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Palghar Hospital Case Shiv Sena Office Bearers Face Charges After Ruckus Abuse And Threats Against Doctors And Staff

Palghar Hospital Case Shiv Sena Office Bearers Face Charges After Ruckus Abuse And Threats Against Doctors And Staff

esakal

Updated on

पालघर: दहीहंडीचा उत्साह संपत नाही तोच पालघरमध्ये एका रुग्णालयात शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात घुसून धुडगूस घातला. तर तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी आणि एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याच्या आरोपांवरून शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित, शहरप्रमुख राहुल घरत, नगरसेवक नीलम संखे यांच्यासह १७ जणांवर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com