esakal | स्वातंत्र्याची सत्तरी; पण कोसेसरी भवाडी विकासापासून कोसोदूर
sakal

बोलून बातमी शोधा

Risky Boating

स्वातंत्र्याची सत्तरी; पण कोसेसरी भवाडी विकासापासून कोसोदूर

sakal_logo
By
महेंद्र पवार

कासा : राज्यकर्ते सातत्याने भारताचा विकास झाल्याचे ढोल वाजवत असले तरी आजही ग्रामीण भागातील लोकांना अनेक समस्यांना (Rural problems) सामोरे जावे लागत आहे. पालघर (palghar) सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात (tribal area) तर अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने आजारी लोकांना डोलीत घालून रुग्णालयात न्यावे लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला कासा (kasa) सारख्या ग्रामीण भागात होडीतून प्रवास (boat traveling) करावा लागत आहे .

हेही वाचा: भाजपचा शिवसेनेला धक्का; आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची उचलबांगडी

याची खणत राजकारणी लोकांना असल्याचे दिसत नाही. निवडणुका आल्यावर मत मागण्या पुरताच या भागाशी राजकारण्यांचा संबंध येत असतो. हीच अवस्था सद्या डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील नागरिकांची झाली आहे येथील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी यांना आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो, नदी होडीच्या साह्याने ओलांडून जावे लागते.या नदीवर पूल बांधून मिळावा या साठी नागरिक अनेक वर्षा पासून मागणी करीत आहेत. पण प्रशासन अजून कोणतीही उपाय योजना करीत नाही.

कासा, तलवाडा, येथील परिसरात जाण्यासाठी रोजचा प्रवास करावा लागतो. सद्या शाळा सुरु झाल्याने तेथील जीवघेणा प्रवास सुरु झाला आहे.भागातील कोसेसरी व सोलशेत या गावात लोकांना जीवाचा धोका पत्करून नाइलाज म्हणून दररोज सूर्या नदी पार करावी लागते. दर दिवशी शेकडो नागरिक सूर्या नदीपात्रातून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत, या मुळे आता पर्यंत अनेक जणांचे अपघात झाले आहेत. ही स्थिती समजल्यावर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी विश्वनाथ पोयेकर यांनी जि.प.सदस्य शैलेश करमोडा यांची भेट घेऊन त्वरित कोसेसरी गावात जाऊन संरक्षणात्मक उपाय योजण्याची तयारी दाखवली.

हेही वाचा: माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम SC कडून रद्दबातल; तरीही ३०८ गुन्हे दाखल

त्यानुसार रहिवाशांना सर्व प्रथम नदी ओलांडताना या पुढे तरी कोणताही अपघात घडू नये महणून सामाजिक बांधिलकी या नात्याने 40 लाईफ जॅकेट वापरण्यासाठी उपलब्द करून देण्यात आले. बोटीपर्यंत जाण्यासाठी दोन्ही किनाऱ्यावर पायऱ्या बांधून देणे, बोटीमध्ये रबर चटई, नायलॉन दोरी, दोरी बांधण्यासाठी खांब,रबरी हातमोजे, सुरक्षेसाठी सूचना फलक, लाईफ जॅकेट सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटे बसवून देणे आणि बोट चालकांची रोजंदारीवर नेमणूक करून देणे अशा विविध गरजांची पूर्तता ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. याच बरोबर कोसेसरी आणि सोलशेत या गावांच्या शालेय शिक्षणासाठी अनेकविध गरजांची पूर्तता देखील करण्यात आली असून अशी मदत पुढेही ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे असे ट्रस्ट प्रतिनिधीमार्फत सांगण्यात आले.

"प्रशासनाकडे येथील नदी वर पूल बांधून मिळावा या साठी ग्रामपंचायतमार्फत प्रस्ताव पाठवले आहेत पण अजून काही कार्यवाही होताना दिसत नाही. मुसळे सामाजिक संस्थे मार्फत सद्या सुरक्षितेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करून दिल्या आहेत. त्या मुळे सद्या मोठा आधार मिळाला आहे."

शैलेश करमोडा, पालघर, जि. प. सद्स्य.

loading image
go to top