शक्तिप्रदर्शनामुळे पालघर ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (ता. १०) अखेरच्या दिवशी बहुजन विकास आघाडी आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने पालघरमधील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. या निवडणुकीत काँग्रेससह काही इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक सध्यातरी बहुरंगी होईल, असे चित्र आहे.

पालघर पोटनिवडणुकीसाठी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला. याप्रसंगी पक्षप्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार विलास तरे, वसई-विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव, माजी राज्य मंत्री मनीषा निमकर, पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, काशीनाथ चौधरी, प्रवीण राऊत व अन्य मंडळी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी आमदार गिरीश महाजन, पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मनीषा चौधरी, भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. ढोल पथक व डीजेच्या जोशात निघालेल्या या रॅलीत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने भाजप उमेदवाराला समर्थन दिल्याचे या वेळी स्पष्ट झाले.

पालघरमधील पोटनिवडणुकीत 20 अर्ज दाखल
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्जांची संख्या आता २० वर पोहचली आहे. 

गुरुवारी अखेरपर्यंत १४ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी समता सेनेतर्फे अपक्ष म्हणून संदीप जाधव, बविआचे बळीराम जाधव, संत भसरा, राजेश पाटील, काँग्रेसतर्फे दामोदर शिंगडा, मधुकर चौधरी, भाजपतर्फे पास्कल धनारे, राजेंद्र गावित यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. 

Web Title: Palghar Loksabha election Power presentation politics