palghar
palghar

पालघर हत्याकांड ! सीबीआयकडे तपास सोपवण्याची भाजप नेत्याची मागणी

Published on

कासा : पालघर जिल्हामधील गडचिंचले येथे 16 तारखेला झालेल्या तिहेरी हत्याकंडाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.9) त्या परिसराचा दौरा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून हा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. 

काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले भागाचा दौरा केला होता. दरम्यान दरेकर यांनी देखील या भागाचा दौरा करत संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलिस यंत्रणांना काही सूचना देखील दिल्या.

आतापर्यंत या प्रकरणात 119 आरोपींना अटक केली आहे. तसेच अनेक आरोपींसह सामान्य नागरिक ही भितीपोटी जंगलात पळून गेले आहेत, त्यात काही निरपराध लोक असून काही महिलांची प्रसूती ही जंगलात झाली आहे. यावेळी आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, तहसीलदार राहुल सारंग,  पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

 Palghar moblyncing case is being investigated by the CBI

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com