महायुतीने 28 पैकी 20 जागा जिंकूनही नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा

महायुतीने 28 पैकी 20 जागा जिंकूनही नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा

पालघर: पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा 20 जागांवर विजय मिळला आहे. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला आहे.

पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांचे आज निकाल जाहीर करण्यात आले. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना येथे रंगला. 90 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले होते. यामध्ये भाजप-शिवसेना-रिपाई युती सरकाने बहुमत मिळवत एकूण 20 जागेवर झेंडा फडकावला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 02 आणि अपक्षांनी 05 जागा जिंकल्या.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला काळे, तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील, असे तीन उमेदवार उभे होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला. नगराध्यक्षपदासाठी युतीच्या श्वेता पिंपळे उभ्या होत्या. 14 प्रभागांमध्ये नगराध्यक्षसह 28 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचही बंडखोर उमेदवार निडवडून आले आहेत. पालघर नगरपरिषद शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र बंडखोरीमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com