

Vadhavan Port Protest 52 Organizations in Palghar Oppose Projects Demand Basic Facilities Before Any New Development Work
esakal
बोईसर /तारापूर : पालघर जिल्ह्यातील वाढवण आणि मुरबे बंदरांसह विविध प्रस्तावित प्रकल्पांविरोधात जिल्ह्यातील ५२ संघटना एकवटल्या आहेत. या प्रकल्पांना विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) वरोर येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आधी रस्ते, दवाखाने आणि शाळा या मूलभूत सुविधा द्या, त्यानंतरच प्रकल्पांचा विचार करा,’ अशी ठाम भूमिका मांडत वाढवण बंदराचे सुरू असलेले काम तत्काळ थांबवण्याची मागणी या सभेत करण्यात आली.