पालघर जिल्हा काँग्रेस फुटीच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पालघर जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी पदाधिकार्यांच्या नियुक्तया कोणालाही विश्वासात न घेता केल्या आहेत, हे सत्य आहे. मात्र, या बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. तसेच हे वातावरण लवकरच निवळेल असा मला विश्वास आहे.
- राजेंद्र गावित, माजी आदिवासी विकास राज्य मंत्री.

नव्या कार्यकारणी नियुक्तीने खिंडार पडण्याची शक्यता

मोखाडा: पालघर जिल्हयात काँग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यातच विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या काँग्रेसमध्ये नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्यांमुळे वाद ऊफाळून आला आहे. जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी निष्ठावंतांना डावलून मर्जीतील समर्थकांच्या, पदाधिकारी म्हणून नियुक्तया केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस च्या पडत्या काळात निष्ठावंत राहिलेले कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा घ्या, नाहीतर आमचे राजीनामे स्विकारा असे खरमरीत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना पाठविले आहे. त्यामुळे पालघर जिल्हा काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहे.

पालघर जिल्हा कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारीणी जाहिर केली आहे. मात्र, या कार्यकारीणीतील काहि सदस्य कॉंगेस पक्षात आले कधी त्यांचे पक्षात योगदान काय याची पुसटशीही कल्पना जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रदेशाचे सचिवानाही नाही, अशा लोकांची नियुक्ती करण्यात आल्याने सध्या अनेक महत्वाचे पदाधिकारी नाराज आहेत.तर मोखाडा तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी ज्या पदाधिकाऱ्यांची शिफारस सर्वानुमते झाली होती, तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकार्यांच्या सहीने हे नाव प्रदेशपातळीवर गेले होते. मात्र, त्यांना जाणीवपूर्वक जिल्हा चीटणीस करण्यात आले असुन तालुकाध्यक्ष पदापासून टाळण्यासाठीच ही खेळी केल्याचा आरोप एका पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात पदाधिकाऱ्यांनी केला आहे.यामुळे जिल्ह्यात काँग्रेस वाढवायची आहे कि मनमानी कारभारामुळे संपवायची आहे असा सवाल येथील कार्यकर्ते आता विचारत आहेत.

यामुळे कट्टर काँग्रेसी कार्यकर्त्याला न्याय द्या अन्यथा आमचे राजीनामे घ्या अशी मागणीचे पत्र सर्वांच्या सहीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविले आहे.  याची ठीणगी जरी मोखाड्यात पडली असली तरी वाडा जव्हार डहाणु यातालुक्यातुनही या अनागोंदी कारभाराला तिव्र विरोध होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाउपाध्यक्षांपासून शहराध्यक्षाबरोबरच माजी जिल्हाध्यक्ष तसेच सध्याचे प्रदेश सदस्य असलेल्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असुन लवकरच जिल्हा तालुक्यातील नाराज पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी चव्हाण यांना आज भेटणार असल्याचे कळते. लवकरच प्रदेशचे आणि जिल्हा कार्यकारिणी मधीलही जुने पदाधिकारीराजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा काँग्रेसला खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांच्याशी संपर्क करूनही त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

Web Title: palghar news palghar district congress politics