
Diwali Shopping
ESakal
विक्रमगड : दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईचा फटका या वर्षी दिवाळीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. वाढते गॅस, पेट्रोल व डिझेलचे भाव याचा फटका सर्वच वस्तूंना बसला असून, सर्वांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. विक्रमगड हा आदिवासीबहुल तालुका असून, येथील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.