Police
sakal
पालघर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार काळात नागरिक आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून शांतता आणि कायद्याचे भान राखा, असे आवाहन पालघर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद टोकाचे न होता, लोकशाही मूल्यांचा आदर व्हावा, यासाठी हे विशेष आवाहन जारी करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.