crime news
मनोर : पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील माकणे गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४५ लाखांचे अंमली पदार्थ (ब्राऊन शुगर जप्त) करण्यात आले. रविवारी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे.यातील एका अल्पवयीन आरोपीची रवानगी रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई केली.