
खारघर, (बातमीदार) : पावसाळा सुरू होताच पर्यटक विविध पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. यावेळी नवी मुंबईतील खारघर येथील विशेष ओळख असणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इत्यादी शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. मात्र यंदा पर्यटकांच्या या आनंदावर विरजण पडणार आहे.