सर्वात मोठी बातमी : मुंबईतील कोरोनाची इतिहासात होणार नोंद, 'ही' माहिती जपून ठेवली जाणार...

समीर सुर्वे
Saturday, 6 June 2020

19 व्या शतकात मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीनंतर सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीचा दस्तावेज तयार होणार आहेत.

मुंबई : 19 व्या शतकात मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीनंतर सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीचा दस्तावेज तयार होणार आहेत. यातून भविष्यात अशा प्रकारची साथ आल्यास कशा प्रकारे प्रतिबंध करावा याची माहिती सहज उपलब्ध होणार आहेत.

केंद्रीय पथकाने शुक्रवारी वांद्रे येथील खेरवाडी प्रतिबंधित क्षेत्रासह काही जंम्बो कोविड केंद्रांची पाहाणी केली. या पाहाणीनंतर झालेल्या बैठकित या पथकाने महापालिकेने आतापर्यंत केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे डॉक्युमेंटेशन तयार करण्याची सुचना केली आहे. यात रुग्णालय उभारण्यासाठी प्रतिबंधासाठी केलेल्या सर्व उपायांची नोद करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन भविष्यात कधी अशा प्रकारची साथ आल्यास त्या नोंदीची मदत घेता येईल.

मोठी बातमी - आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर

महापालिकेने 1 हजार पेक्षा जास्त खाटांचे काही कोविड केंद्र उभारले आहेत. तसेच, प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीची हायरिस्क लो रिस्क वर्गवारी करणे, विलगीकरण कक्ष तयार करणे असे उपाय केले आहेत. तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. वैद्यकिय कर्मचार्यांचे व्यवस्थापन या सर्व बाबींची नोंंद करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

"केंद्रीय पथकाने पालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे डॉक्युमेंटशन करण्याची शिफारस केली आहे " असे पालिकेच्या उप आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितले.

केंद्रीय पथकाने आज वांद्रे खेरवाडी येथील कोविड प्रतिबंधीत विभागाला भेट देऊन परीस्थीतीचा आढावा घेतला. यामध्ये केंद्रीय पथकाने कंटेनमेंट झोनमधील वयस्कर नागरीक, झोपडपट्टी आणि चाळीत राहणारे रहिवाशी यांच्यावर विशेष लक्ष देण्यास सूचित केलंय. या सोबतच आयोग्य सेतू या मोबाईल ऍपच्या धर्तीवर नागरिकांसाठी एक विशेष मोबाईल ऍप बनवण्याच्या सूचना केल्यात. 

मोठी बातमी - बापरे! मुंबईतून गावी गेलेल्या स्थलांतरितांची उत्तर प्रदेशात दहशत; तब्बल 'इतके' जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह..

1896 च्या सप्टेंबर महिन्यात प्लेगच्या पहिल्या रुग्णांची नोंंद झाली. ही साथ हळूहळू देशभरात पसरली. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तयार करण्यात आला होता.कोनोच्या साथ नियंत्रणासाठीही हाच कायदा सध्या देशभरात लागू आहे. प्लेगनंतर कोविडच्या साथीसाठी पहिल्यांदाच हा कायदा एकाच वेळी संपुर्ण देशात लागू केला आहे.यात कायद्याच्या आधाराने प्रशासनाला विशेष अधिकार प्राप्त होतात. या साथीची नोंद अनेक वैद्यकिय जर्नल्समध्ये नोंद आहे. तसेच काही संशोधनात्मक पुस्तकेही प्रकाशीत झाली आहेत. त्याच धर्तीवर आता मुंबईतील कोरोनाचीही इतिहासात नोंद होणार आहे.

pandemic of corona virus historic documentation will be done for future references


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandemic of corona virus historic documentation will be done for future references