पांडवकडा धबधब्यावर पोलिसाकडून पर्यटकांना प्रवेश बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

खारघर परिसरातील धबधबा तसेच  खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक पर्यटक बुडून मरण पावल्याची घटना घडल्या आहेंत. त्यामुळे पांडवकडा आणि खारघर पोलीस ठाणे हद्दीतील पावसाळी पर्यटनस्थळी प्रवेशबंद करीत असल्याचे पत्र सहाय्यक पोलीस आयुक्तांनी खारघर पोलिसांना दिल्याने खारघर पोलिसांनी पांडवकडा धबधब्यावर कडक बंदोबस्त ठेवले आहे. आज रविवार सुट्टीच्या दिवशी पावसाचा आनंद घेण्यासाठी दुरुन आलेल्या पर्यटक मात्र नाराज होत आहेत.

खारघर : खारघर परिसरातील धबधबा तसेच  खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक पर्यटक बुडून मरण पावल्याची घटना घडल्या आहेंत. त्यामुळे पांडवकडा आणि खारघर पोलीस ठाणे हद्दीतील पावसाळी पर्यटनस्थळी प्रवेशबंद करीत असल्याचे पत्र सहाय्यक पोलीस आयुक्तांनी खारघर पोलिसांना दिल्याने खारघर पोलिसांनी पांडवकडा धबधब्यावर कडक बंदोबस्त ठेवले आहे. आज रविवार सुट्टीच्या दिवशी पावसाचा आनंद घेण्यासाठी दुरुन आलेल्या पर्यटक मात्र नाराज होत आहेत.

खारघर डोंगरावरून पावसाळ्यात पाझरणाऱ्या पाण्याचे झरे निर्माण होवून पांडवकडा, ओवेकॅम्प धरण, तसेच फणसवाडी, चाफेवाडी परिसरात धबधबे तयार होतात. धबधब्याच्या धारेखाली डोंगरावरील दगड येवून पर्यटकांच्या डोक्यात पडून तसेच खोल पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे पर्यटक जखमी आणि बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेंत. अश्या घटना घडू नये म्हणून सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेवून खारघर परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे पत्र सहाय्य्य्क पोलीस आयुक्त प्रदीप माने यांनी सिडको, वन विभाग आणि खारघर पोलिसांना पाठविल्याने खारघर पोलिसांनी पांडवकडाच्या प्रवेशद्वार आणि पांडवकडा धबधब्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 

Web Title: Pandhakada waterfall entry closed for tourists