पंढरपूर-यशवंतपूर नवी साप्ताहिक एक्‍स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - पंढरपूर-यशवंतपूर मार्गावर नवीन साप्ताहिक एक्‍स्प्रेस चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गाडी क्रमांक 16542 ही सहा जुलैपासून प्रत्येक शुक्रवारी दुपारी 1.35 वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता यशवंतपूरला पोचेल. गाडी क्रमांक 16541 ही पाच जुलैपासून प्रत्येक गुरुवारी सायंकाळी सहा वाजता यशवंतपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पंढरपूरला पोचेल.
Web Title: pandharpur yashwantpur weekly express