ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना 'हा' जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गायिका कविता कृष्‍णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार
Pandit Hridaynath Mangeshkar
Pandit Hridaynath Mangeshkar Sakal media

मुंबई : मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणाऱ्या पं. ह्रदयनाथ मंगेशकर (pandit hridaynath mangeshkar) यांना यावर्षीचा मोहम्मद रफी (Mohammed Rafi life Gaurav Award) जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमूर्ती (Kavita krishnamurti) यांना सन 2021चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार (Mohammed Rafi Award) देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज केली. हा पुरस्कार वितरण सोहळा २४ डिसेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Pandit Hridaynath Mangeshkar
"वस्त्रोद्योगावरील प्रस्तावित GST दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घेऊ"

आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल व श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या तेरा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर आणि कविता कृष्‍णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली याबद्दल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे फिर रफी या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण, सरिता राजेश हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com