पांडुरंगाच्या दर्शनासाठी एसटीची "विठाई' बस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी सेवेत नव्या रूपात "विठाई' एसटी सज्ज झाली आहे. पुण्यातील दापोडी कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या या बसगाडीतून भाविकांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच या बसचे पंढरपूर येथे उद्‌घाटन होईल, असे सांगण्यात आले.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून "विठाई' बसगाडीची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येतात. प्रवासाची पुरेशी साधने नसल्याने भाविकांची लूट होते. त्यामुळे भाविकांची सोय व्हावी म्हणून "विठाई' बसगाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांसाठी ऍल्युमिनियमऐवजी पोलादाचा वापर केल्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखदायक होणार आहे.

या बसगाड्यांमध्ये आकर्षक सजावट केली जाणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना विशेष भाडे भरून "विठाई' बसमधून प्रवास करता येईल. सध्या अशा दहा बस पासिंगसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यांनतर या बसगाड्या एसटीच्या वेगवेगळ्या विभागांकडे पाठवण्यात येतील. त्या संदर्भात लवकरच नियोजन केले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बसची वैशिष्ट्ये
- ऍल्युमिनियमऐवजी पोलादी पत्र्याचा वापर.
- आरामदायक आसने, दोन आपत्कालीन दरवाजे.
- एकूण 42 प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था.

Web Title: Pandurang Darshan ST Vithai Bus