पंकज भुजबळ यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज शनिवारी विशेष न्यायालयाला शरण आला. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर त्यांची सुटका करण्यात आली. पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. तो मागे घेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शरण येण्याची हमी त्यांनी उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार ते न्यायालयात हजर झाले. 14 मार्च 2016 रोजी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
Web Title: pankaj bhujbal bell sanction