esakal | प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात संधी न मिळण्यावर पंकजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja-Munde-Pritam-Munde

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात संधी न मिळण्यावर पंकजा म्हणतात...

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये खासदार प्रितम मुंडे (Dr. Pritam Munde) यांना स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे या दोघी भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर भाजपने स्पष्टीकरण दिलं असून त्या नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करु नका, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज खुद्द पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं. (Pritam Munde not getting Central Ministry Pankaja Munde first reaction over Union Cabinet Expansion)

हेही वाचा: खडसेंच्या ED चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भाजपला इशारा

पंकजा यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

  • मी माध्यमांच्या समोर सगळ्या मंत्र्यांचे अभिनंदन करते. दुपारी 4 वाजेपर्यंत संभाव्य नावे येत होती. त्यामुळे अभिनंदन करता आले नाही. प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल अशा बातम्या काही लोकांनी दाखवल्या. मला खूप फोनही आले म्हणून मी स्पष्ट केलं की आम्ही मुंबईत आहोत. आणि मी जाहीरपणे सांगते, आम्ही दोघीही नाराज असल्याचे काहीही कारण नाही.

  • भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी मी बोलले. डॉ. भागवत कराड यांचा मला फोन आला होता. त्यावेळी मला त्यांच्याबद्दल कळलं. मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

  • जनतेचे आमच्यावर प्रेम आहे. भाजपची पक्ष म्हणून एक पद्धत आहे, त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. प्रीतम ताई यांचेच नाही तर अनेक खासदारांची नावं चर्चेत होती.

  • भाजपला मला संपवायचंय असं मला अजिबात वाटत नाही. मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही तर व्रत म्हणून आले आहे. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संपविण्यासाठी असं काही करतील.

  • केवळ आम्हालाच वंजारी समाजाची म्हणून पाहणे चुकीचे. वंजारी समाजाचा कोणी मंत्री होत असेल तर त्यांनी मुंडे साहेबांसारखे समाजाची ताकद वाढवावी.

  • मी ज्येष्ठ नेता नाही, पक्ष वाढविण्यासाठी पक्षाचे नेते निर्णय घेतले जातात. नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. पक्षाची ताकद वाढेल असे नेत्यांना वाटते म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली असावी.

हेही वाचा: मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...

टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्रवर पंकजा म्हणाल्या...

  • टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र असं काही आहे हे मला माहित नाही. भाजपला टीम पद्धत मान्य नाही. भाजप पक्षाचा सन्मान करणारी मी सामान्य कार्यकर्ता आहे.

  • माझ्याबद्दल संजय राऊत यांनी 'सामना'तून लिहिल्याचे पत्रकार सांगत आहेत. पण माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. संजय राऊत यांचा मोठा अभ्यास आहे. मी त्यांच्याशी बोलले नाही.

  • प्रीतम मुंडे या गोपीनाथ मुंंडेंच्या मृत्यूनंतर अचानक राजकारणात निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि त्यामागे केवळ लोकांमधील नकारात्मकता शांत करणे हाच हेतु होता. पक्षासाठी पायाला फोड येईपर्यंत आम्ही काम केले.

loading image