भाजपचा नाराज गट एकवटतोय? पंकजा मुंडेंशी नेत्यांची चर्चा

pankaja munde annoyed with bjp leaders meets vinod tawde ram shinde
pankaja munde annoyed with bjp leaders meets vinod tawde ram shinde

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. 2) फेसबुकवर प्रकाशित केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर ट्विटरवरूनही त्यांनी पक्षाचे नाव हटवले होते. त्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर आहेत किंवा त्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. तसेच येत्या 12 डिसेंबरला आपण आपला निर्णय जाहीर करू असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले असल्यामुळे याबाबत कोणताही निर्णय बांधणं घाईचं असल्याचं बोललं जातयं.

पंकजा मुंडे यांना कोण कोण भेटले?
दरम्यान, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, राम शिंदे आणि बबनराव लोणीकर यांनी यांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर भाजपमधील नाराज नेत्यांचा गट मुंडे यांना मिळत आहे. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडत चालली आहे का? अशा शक्यतांना बळ मिळत आहे. तावडे यांनी पंकजा मुंडेंची रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी, सकाळी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनीही पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. यासह माजी मंत्री राम शिंदे यांनीही पंकजा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. लोणीकर आणि मुंडे यांच्यात जवळपास एक सात चर्चा झाल्याची माहिती आहे.

कोण का आहे नाराज?

  • प्रकाश मेहता - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकराली 
  • पंकजा मुंडे - भाजपच्या नेत्यांमुळेच विधानसभा निवडणुकीत पराभव
  • एकनाथ खडसे - कन्या रोहिणी खडसेंच्या पराभवाला भाजपचे वरिष्ठ जबाबदार
  • विनोद तावडे - विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले 

खडसे काय म्हणाले? 
पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे भाजपमधील नाराज नेत्यांचा गट असल्याची चर्चा आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव आघाडीवर आहे. पंकजा आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवास पक्षातील काही लोक कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. खडसेंप्रमाणेच प्रकाश मेहता हे भाजपमधील ज्येष्ठ नेतेही मुंडेंच्या पाठी उभे राहिले असल्याची चर्चा आहे. 

शिवसेना-भाजपकडून वेगवेगळे दावे
दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंसह इतर अन्य नेते आमच्या संपर्कात आहेत, असे म्हटल्याने भाजपमध्ये मोठा भूकंप झाला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंडे प्रकरणाबाबत खुलासा केला. मात्र, आज पुन्हा पंकजा मुंडे यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना भाजपचे कमळ असलेला फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यामुळे सध्यातरी त्या भाजपमध्येच आहेत, असे स्पष्ट झाले. मात्र, या सर्व चर्चांना यू-टर्न मिळणार की, येत्या 12 डिसेंबरला भाजपमध्ये मुंडेंच्या पाठीशी असलेला नाराजांचा गट मोठा भूकंप करणार का? हे येणारी वेळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com