esakal | चांगलं जमेल थोड्या दिवसात.., पंकजा मुंडेंच्या 'या' ट्विटची चर्चाच चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

चांगलं जमेल थोड्या दिवसात.., पंकजा मुंडेंच्या 'या' ट्विटची चर्चाच चर्चा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या मुंडेंच्या या पोस्टची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या छंदाविषयीची माहिती सर्वांशी शेअर केलीय. पण ही पोस्ट शेअर करताना त्यांनी भावनिक मेसेज सुद्धा दिला आहे. 

चांगलं जमेल थोड्या दिवसात.., पंकजा मुंडेंच्या 'या' ट्विटची चर्चाच चर्चा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या मुंडेंच्या या पोस्टची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या छंदाविषयीची माहिती सर्वांशी शेअर केलीय. पण ही पोस्ट शेअर करताना त्यांनी भावनिक मेसेज सुद्धा दिला आहे. 

पंकजा यांनी या शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वतः काढलेलं चित्र शेअर केलं आहे. हे चित्र शेअर करताना त्यांनी लिहिलेल्या शब्दांवरुन वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यावर भावनिक ट्विट केलं होतं. दरम्यान दोन दिवसातच त्यांनी स्वतः चित्र काढून ते सोशल मीडियावर शेअर केलं. यावर त्यांनी भावनिक कॅप्शननंही दिलं आहे. 

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

पोस्टवर शून्यापासून सुरू केलं, असं कॅप्शन लिहिल्यानं पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय आहे. याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

या ट्विटमध्ये त्यांनी दोन चित्र काढलेत. त्यावर स्वतःच स्वतःला शिकवते आहे  ...शून्यापासून सुरू केलं. चित्र चांगलं जमेल थोडे दिवसात !!, असं कॅप्शन त्यांनी यावर दिलं आहे. 

पंकजा मुंडे भाजपवर नाराज 

21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपकडून  निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं गेलं. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव वगळ्यात आलं. 

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

उमेदवारी न दिल्यानं नाराज झालेल्या पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांसाठी भावनिक ट्विट केलं. आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!, असं ट्विट त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

pankaja mundes wmotional tweet of painting is viral on internet read full news

loading image