मुंबई : निर्भया पथकाची कौतुकास्पद कामगीरी; वाचवलं नवजात बालकाचं प्राण | Mumbai Nirbhaya Pathak Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirbhaya Pathak

मुंबई : निर्भया पथकाची कौतुकास्पद कामगीरी; वाचवलं नवजात बालकाचं प्राण

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोरच्या (Ghatkopar) रमाबाई नगर परिसरातल्या एका गटारात नवजात बालिक पडलेली (New born baby ) असल्याचा फोन कंट्रोल रुमला आला होता, त्यानंतर पंतनगर पोलिसांच्या (pantnagar police) निर्भया पथकानं (Nirbhaya Pathak) तिथं जाऊन त्या बाळाला ताब्यात घेऊन तातडीनं राजावाडी रुग्णालयात (Admitted in rajawadi hospital) दाखल केलं. सध्या चिमुकलीवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: मुंबई काँग्रेसमधली भांडण, भाई जगतापांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

नाल्याच्या जवळच घर असलेल्या सुरेंद्र रणपिसे यांना रात्री मांजराचा आवाज येत असल्यानं जाऊन बघितलं तर त्यांना तिथं बाळाचा आवाज येत होता. तेव्हा त्यांना कापडात गुंडाळलेली नवजात चिमुकली दिसली. त्यानंतर त्यांना कंट्रोल रुमला फोन केला. गटारात पडलेली असल्यानं तिच्या पोटात पाणी गेलंय, तिच्या वेगवेळ्या टेस्ट करुन तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

loading image
go to top