esakal | पनवेल : टँकरसह ३६ गॅस सिलिंडर जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पनवेल : टँकरसह ३६ गॅस सिलिंडर जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल (Panvel) तालुक्यातील पोयंजे गावाजवळ टँकरमधील एलपीजी गॅस बेकायदा आणि धोकादायक पद्धतीने सिलिंडरमध्ये (cylinder) भरणाऱ्या चौघांना पनवेल तालुका पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली आहे. या गॅस (Gas) सिलिंडरची चौघे खुल्या बाजारात विक्री करत असल्याचे तपासात आढळल्याने पोलिसांनी (Police) व्यावसायिक वापराचे ३६ एलपीजी • सिलिंडर, गॅसने भरलेला टँकर, पिकअप जीपसह इतर साहित्य जप्त केले.

पोयंजे गावजवळ काही व्यक्ती टँकरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या भरत असून खुल्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पहाटे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाने छापा मारला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एलपीजी टँकरला जोडलेल्या जुगाड मशिनद्वारे खरी पाइप व रेग्युलेटरच्या साहाय्याने धोकादायक पद्धतीने सिलिंडरमध्ये अवैधरीत्या गॅस भरत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा: IPL बेटींगसाठी लाच मागणाऱ्या PSIला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी याप्रकरणी सोमराज कृष्णराम विष्णोई (२३), मांगीलाल बन्सीलाल बिष्णोई (१९), सुभाष कृष्ण राम पुनिया (२४) व टँकरचालक जलाल उद्दीन अलीमुद्दीन खान (२९) या चौघांना ताब्यात घेतले. तसेच त्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी आणलेले २६ रिकाम व्यावसायिक सिलिंडर व जुगाडमशीनद्वारे भरलेले १० व्यावसायिक वापरातील सिलिंडर, गॅसने भरलेला टँकर, पिकअप टेम्पो व इतर साहित्य, दुचाकी असा सुमारे ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. टँकरचालकाला प्रति सिलिंडर ८०० रु. विनापरवाना गॅस सिलिंडर भरून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: भाजपचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन; पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप

यातील एलपीजीचा गॅस टँकर घेऊन येणाऱ्या चालकाला एका सिलिंडरमागे ८०० रुपये देण्यात येत असल्याचे तपासात आढळले. हे गॅस सिलिंडर खुल्या बाजारात दीड ते दोन हजार रुपयांमध्ये विकत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

loading image
go to top