पनवेल : गतिरोधकावर दुचाकी आदळून एकाचा मृत्‍यू ; गुन्हा दाखल

Accident
Accidentsakal media

पनवेल : डेरवली येथून पनवेलकडे जाणाऱ्या दुचाकीस्‍वाराला अंधारात गतिरोधक (Speed breaker) निदर्शनास न आल्याने झालेल्या अपघातात (Bike Accident) पाठीमागे बसलेला तरुणाचा पडून मृत्‍यू झाला (one person death) तर दुचाकीचालक गंभीर जखमी (Driver Injured) झाल्याची घटना मंगळवारी रात्री पनवेलमध्ये घडली. दुचाकीस्‍वाराच्या निष्काळजीमुळे अपघात झाल्याचे आढळल्‍याने पनवेल शहर पोलिसांनी (Panvel city Police) चालकाविरोधात गुन्हा दाखल (Police FIR) केला आहे.

अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव जनक झनकर बडेला (२१) असून तो करंजाडे सेक्टर-३ मध्ये कुटुंबासह राहतो. व त्याच ठिकाणी सुरक्षारक्षक म्‍हणून काम करत होता. तर अपघातात जखमी धर्मराज भरम साही (२३) हा करंजाडे सेक्टर ४ मध्ये वॉचमन म्हणून काम करत होता.

जनक व धर्मराज दोघे मित्र असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास डेरवली येथून पनवेलकडे जात होते. यावेळी गतिरोधकाकडे धर्मराजने लक्ष न दिल्‍याने दुचाकी जोरात आदळली. आणि पाठीमागे बसलेला जनक बाजूला फेकला गेला. डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाल्‍याने रुग्‍णालयात नेताच डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com