
विरार : मुंबईच्या उपनगरी प्रवासाला नवा पर्व देणारा पनवेल-बोरिवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिल्यामुळे लाखो प्रवाशांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. या मार्गामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रवाशांना कुर्ला वा वडाळा येथे गाडी बदलण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.