

Panvel-Karjat Local Update
ESakal
मुंबई : पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठेवले आहे. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.