BREAKING : पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात पालिकेच्या आरोग्य विभागाने दाखवलेल्या ढिसाळपणामुळे देशमुख यांची बदली झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात पालिकेच्या आरोग्य विभागाने दाखवलेल्या ढिसाळपणामुळे देशमुख यांची बदली झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवक आणि माजी आमदारांचीही नाराजी होती.

मोठी बातमी ः निलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा

राज्यासह देशभरात फोफावलेल्या कोरोनाच्या विळख्यात पनवेल महापालिकाही सापडली आहे. परंतु या काळात कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्यात पनवेल महापालिका यंत्रणेला आलेला अपयश अंगलट आला आहे. संशयित कोरोनाबाधितांना क्वारंटाईन करणे, हायरिस्कमधील नागरीकांचे स्वॅब घेणे, त्यांना सर्व सुख-सुविधा देऊन काळजी घेणे, वेळेवर उपचार करणे आदी महत्वांच्या बाबी हाताळणे पालिका प्रशासनाला जमले नाही. कोरोनाच्या काळात महापालिकेच्या उदासिन कारभारामुळे रुग्णांची होणारी गैरसोयीवर सत्ताधारी पक्षातील आमदारांपासून माजी आमदारांनीही नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पनवेल शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारचे वाभाडे काढताना पालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते. या पत्रकार परिषदेला 24 तास ही उलटत नाही तोच राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने देशमुख यांची बदली करून नाराजीवर शिक्का मोर्तब केला आहे. 

मोठी बातमी ः नवी मुंबईकरानो, तुमच्यासाठी अभिमानाची बातमी ! सलग दुसऱ्यांदा मिळवला 'हा' दर्जा

पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बदलीनंतर 18 एप्रिल 2018 ला गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा कारभार हाती घेतला. महापालिकेवर आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर देशमुख यांनी शहराच्या भविष्यातील 50 वर्षांच्या विकासाचे नियोजन करून शहराला कचरामुक्त शहर, अद्ययावत शिक्षण, अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था, पाणीटंचाईतून मुक्तता असे अनेक गोंडस स्वप्न दाखवले होते. परंतु त्यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत एकाही मोठ्या प्रकल्पांना देशमुख यांना सुरूवात करता आली नाही. महापालिका झाल्यावर अतिक्रमण तोडणे आणि करपद्धतीत बदल करणे या पलीकडे पनवेलकरांना महापालिका झाल्याचा बदल जाणवला नाही. 

मोठी बातमी ः चर्चगेट येथील सनदी अधिकाऱ्यांची इमारत सील  

पनवेल महापालिकेवर आलेल्या आयुक्तांपैकी गणेश देशमुख हे तिसरे आयुक्त होते. आता त्यांच्या जागेवर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची चौथे आयुक्त म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. देशमुख यांनी अद्याप कारभार स्वीकारला नाही. गणेश देशमुख यांनी ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel municipal commissioner ganesh deshmukh transfer amid corona failure