esakal | नवी मुंबईकरानो, तुमच्यासाठी अभिमानाची बातमी ! सलग दुसऱ्यांदा मिळवला 'हा' दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पूरी यांनी देशातील कचरामुक्त असणाऱ्या सहा शहरांच्या नावांची यादी जाहीर केली. यात नवी मुंबई शहराने दुसऱ्यांदा स्थान पटकावले आहे.

नवी मुंबईकरानो, तुमच्यासाठी अभिमानाची बातमी ! सलग दुसऱ्यांदा मिळवला 'हा' दर्जा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळण्यात आलेल्या देशभरातील कचरामुक्त शहरांमध्ये नवी मुंबई शहराने पुन्हा दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे शहराला फाईव्हस्टार रेटींग दर्जा देण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा फाईव्ह स्टारचा दर्जा पटकावणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे. 

हे वाचा : 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पूरी यांनी देशातील कचरामुक्त असणाऱ्या सहा शहरांच्या नावांची यादी जाहीर केली. यात नवी मुंबई शहराने दुसऱ्यांदा स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्यातून फाईव्ह स्टार रेटींग मिळणारे नवी मुंबई शहर एकमेव आहे. नवी मुंबईसह मध्यप्रदेशातील इंदौर, कर्नाटकातील मैसूर, गुजरातमधील सुरत आणि राजकोट, छत्तीसगढमधील अंबिकापूर अशी पाच शहरे फाईव्हस्टार दर्जाची मानकरी ठरली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन वेळा वेगवेगळ्या केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांकडून स्टार रेटींगच्या नियमांनुसार शहराचे बारकाईने सर्वेक्षण केले होते.

नक्की वाचा : गुड न्यूज आली,  कोरोना संक्रमित मातांकडून 203 सुखरूप बाळांचा जन्म

केंद्र सरकारमार्फत नियुक्त त्रयस्थ संस्थेच्या निरीक्षक पथकांनी कागदपत्रांची पाहणी केली होती. तसेच शहरातील विविध स्थळांना अचानक भेट देऊन विविध ठिकाणच्या स्वच्छतेची व कचरा वर्गीकरणाच्या स्थितीची पाहणी केली होती. कचऱ्याचे संकलन, वाहतूक पध्दती आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया आदी बाबींची बारकाईने पाहणी केली होती. केंद्रीय पथकाने कोणतीही पूर्व सूचना न देता विविध ठिकाणांना भेट देऊन अचानक नागरिकांशी संवाद साधला. नागरीकांचे प्रत्यक्ष अभिप्रायही केंद्रीय पथकांकडून जाणून घेण्यात आले. अशा पाहणीद्वारे गुणांकन करण्यात येऊन कचरामुक्त शहराचे स्टार रेटींग देण्यात आले.

हे ही वाचा अप्रतिम ! लॉकडाऊनमध्ये जोपासला अनोखा छंद, पक्षांच्या पिसांवर कोरलेली कलाकृती थक्क करणारी

आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना नवी मुंबईला मिळालेल्या या कचरामुक्त शहराच्या फाईव्ह स्टार रेटींगबद्दल समाधान वाटते. फाईव्ह स्टार रेटींगचे श्रेय दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारापासून स्वच्छतेविषयी जागरूक असणारे लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचे आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Garbage free city in the state of Navi Mumbai only city to hit a five-star rating for the second time