

वसंत जाधव
पनवेल : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण असल्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून तब्बल १०८ महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. सर्वाधिक महिला उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली असून, त्यापाठोपाठ शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा क्रमांक लागतो. या महिला उमेदवारांपैकी कोण ‘संधीचे सोने’ करणार, हे चित्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.