

Panvel Municipal Corporation
ESakal
पनवेल : पनवेल महापालिकेच्या महासभेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी मेट्रो-१२ प्रकल्पासाठी मागितलेल्या १,२५९.८१ कोटी रुपयांच्या आर्थिक योगदानाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. पालिकेने यापूर्वीच विविध नागरी परिवहन प्रकल्पांसाठी मोठा आर्थिक भार उचलला असल्याने अतिरिक्त निधी देणे शक्य नसल्याची भूमिका प्रशासनाने ठामपणे मांडली. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते.