Stray Dogs
मुंबई
BMC Action: पालिका करणार भटक्या श्वानांसाठी शेल्टर निवाऱ्याची उभारणी, कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार
Stray Dogs : भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भटक्या श्वानांचे निर्बिजिकरण करण्यात येत असून त्यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी शेल्टर निवाऱ्याची उभारणी करत आहे.
पनवेल : भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुमोटो याचिका क्रमांक ०५/२०२५ अनुषंगाने राज्य शासनाने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशांनुसार पनवेल महानगरपालिकेत प्राणी जन्म संनियंत्रण समितीची बैठक नुकतीच आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्राणी जन्म नियंत्रण, श्वानांचे लसीकरण, निर्बिजिकरण आणि नागरिकांच्या सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

