

PMC Bus Service
ESakal
खारघर : पनवेल महापालिकेच्या हद्दीत वाढत्या लोकसंख्येला आणि सार्वजनिक वाहतुकीच्या गरजेला लक्षात घेऊन लवकरच प्रवासी बससेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बस मार्ग निश्चिती, संभाव्य प्रवासीसंख्या आणि बस डेपो उभारणीसाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याकरिता खासगी तज्ज्ञ एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.