BMC Election: पनवेल महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, साडेचार हजार कर्मचारी तैनात
Panvel Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीसाठी पनवेल महापालिका सज्ज झाली आहे. निवडणुकांसाठी साडेचार हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार असून विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
पनवेल : महापालिकेच्या निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून शहरात ३६ भरारी पथके तैनात केली जाणार आहेत.