esakal | किरकोळ कारणावरुन पनवेलमध्ये तरुणाची हत्या; आरोपी अटकेत | Panvel
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

किरकोळ कारणावरुन पनवेलमध्ये तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशन (Panvel railway station) जवळच्या साईबाबा मंदिर परिसरात रहाणाऱ्या एका तरुणाने त्याच भागात रहाणाऱ्या तरुणावर टोकदार हत्याराने हल्ला करुन त्याची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकिस आली आहे. कुमार तिफ्पा रेड्डी (३२) असे या प्ररकरणातील आरोपी तरुणाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी (Panvel police) त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल (FIR) करुन त्याला अटक (Cluprit arrested) केली आहे.

हेही वाचा: वारकऱ्यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन; मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

या घटनेतील मृताचे नाव शब्बीर मोहम्मद शेख (२३) असे असून तो व आरोपी कुमार तिफ्पा रेड्डी हे दोघेही पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या साईबाबा मंदिर परिसरात रहाण्यास होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारस शब्बीर शेख हा आरोपी कुमार रेड्डी याच्या घराजवळ गेला होता. यावेळी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. या भांडणाच्या रागात आरोपी कुमार रेड्डी याने आपल्या जवळच्या टोकधार हत्याराने शब्बीर शेख याच्यावर हल्ला केला.

सदरचे टोकदार हत्यार शब्बीर च्या छातीतून थेट त्याच्या ह्रदयाला लागल्याने तो गंभीर जखमी होऊन काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी कुमार रेड्डी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी दिली.

loading image
go to top