छोटा राजनच्या भावावर बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पनवेल - कुख्यात गुंड छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याच्याविरोधात मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन दीपकने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले; मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी तक्रार महिलेने दिली आहे.

दीपककडे लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने छोटा राजनच्या नावाने धमकावले, असेही पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि दीपक एकमेकांना 2012 पासून ओळखतात. दीपकने प्रथम पनवेल तालुक्‍यात, त्यानंतर लोणावळा, ऐरोली आणि कश्‍मीर येथील विविध ठिकाणी अत्याचार केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हे प्रकरण पनवेल तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.

Web Title: panvel news rape case on chota rajan small brother crime