

Kalamboli accident News
ESakal
वसंत जाधव (पनवेल बातमीदार)
नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. कळंबोलीतील भारत गॅस नाका परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भरधाव चारचाकी गाडीने पदपथावरील पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.