Mumbai Police
sakal
पनवेल : दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांची सुरक्षा आणि शहरातील शांतता राखण्यासाठी पनवेल पोलीस सतर्क झाले आहेत. दिवाळीच्या काळात चोरी, घरफोडी आणि लुटमारीसारखे गंभीर गुन्हे अधिक प्रमाणात घडतात. या कारणास्तव नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.