फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Panvel : पनवेल येथील एका शाळेतील विद्यार्थ्याला शाळेच्या वार्षिक शुल्क थकबाकीच्या कारणावरून परीक्षेस बसू न दिल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Panvel student not allowed for examination due to fee Pending

Panvel student not allowed for examination due to fee Pending

ESakal

Updated on

पनवेल : पनवेल येथील एका शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याला शाळेच्या वार्षिक शुल्क थकबाकीच्या कारणावरून वार्षिक परीक्षेस बसू न दिल्याचा गंभीर प्रकार गुरूवारी (ता. २६) समोर आला आहे. या प्रकरणी परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून विद्यार्थ्याचे राहीलेले पेपर पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास शाळेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com