Stray Dogs Attack
sakal
पनवेल : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चालल्याचे दिसत आहे. अशातच पनवेलमधील कामोठे सेक्टर-१० परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचे समोर आले आहे. एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.