esakal | पनवेल : व्यापक वाहतूक योजनेसाठी सर्वेक्षण Panvel
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पनवेल : व्यापक वाहतूक योजनेसाठी सर्वेक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : शहराची व्यापक वाहतूक योजना तयार करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका (Municipal) क्षेत्रात सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षापासून पनवेल शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे कोंडी, पार्किंगचा प्रश्न, प्रदूषण, अपघात, पादचाऱ्यांना चालण्यास अपुरी पडणारी जागा असे प्रश्न निर्माण होत आहे. याचसाठी पनवेल महापालिका व्यापक वाहतूक योजनेवर लक्ष केंद्रित करत आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांच्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून, विकास आराखडा, वाहतुकीशी संबंधित प्राथमिक दस्तऐवज वापरून सर्वेक्षण केले जाणार आहे.

हेही वाचा: लोणावळ्यात फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण

घरोघरी जाऊन तसेच रेल्वे स्टेशन, बस थांब्‍यासारखी प्रवासाची सुरुवातीची आणि शेवटची ठिकाणे, तसेच प्रवासी नागरिकांच्या गर्दीच्या, येण्या-जाण्याच्या वेळा, कमी गर्दीच्या वेळा आदींचा अभ्यास केला जात आहे. तसेच नागरिकांच्या ठराविक ठिकाणी जाण्याच्या येण्याच्या वेळा, त्यांचा प्रवास करण्यामागचा हेतू, प्रवासाचे माध्यम, त्यासाठी लागणारी किंमत, वेळ अशा सर्व गोष्टींचा समावेश या सर्वेक्षणामध्ये आहे. याचबरोबर अपघात प्रवण क्षेत्र, वाहतूक विभाग, रेल्वे विभाग, एनएमएमटी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्याकडील प्रवासी नागरिकांची माहिती एकत्रित करून यांचा अभ्यास देखील या सर्वेक्षणाअंतर्गत केला जाणार आहे.

हेही वाचा: स्वारगेट चौकात पादचाऱ्यांसाठी होणार दोन भुयारी मार्ग

सर्वेक्षणाअंती पादचाऱ्यांसाठी, सायकलिंग करण्यासाठी, सार्वजनिक वाहतुक करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. तसेच याच माध्यमातून पार्किंगचे महसुली धोरण बनविण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

loading image
go to top