esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

किरकोळ कारणातून पनवेलमध्ये ब्लेडने वार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : तालुक्यातील भेरले गावातील तरुणाने त्याच गावातील तरुणावर किरकोळ कारणातून ब्लेडने वार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष वाघमारे असे ब्लेडने वार करणाऱ्या तरुणाचे नाव असून, पनवेल तालुका पोलिसांनी (Police) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेत जखमी झालेला श्रीकांत काशिनाथ वाघमारे (२०) हा तरुण व त्याच्यावर ब्लेडने वार करणारा आरोपी संतोष वाघमारे हे दोघेही पनवेल तालुक्यातील भेरले या गावात एकाच वाडीत राहतात. गत १० ऑक्टोबरला रात्री ११.०० वाजता श्रीकांत जेवण करून आपल्या घराबाहेर बसला असताना रात्री ११.३०च्या सुमारास संतोष वाघमारे हा श्रीकांतच्या घरासमोरून दारू पिऊन जात होता. या वेळी तो जोरात थुंकल्याने त्याची थुंकी संतोषच्या हातावर उडाली. त्यामुळे संतोषने त्याला जाब विचारल्याने श्रीकांतला त्याचा राग आला.

हेही वाचा: मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

त्यामुळे त्याने संतोषवर दाढी करण्याच्या (स्टेनलेस स्टील) ब्लेडने गळ्या छातीवर तसेच वरगड्यांवर वार करून पलायन केले. या हल्ल्यात संतोष जखमी झाल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर श्रीकांतने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

loading image
go to top