

Panvel-Karjat Local train Project
ESakal
कर्जत : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात आमूलाग्र बदल घडवणारा पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुमारे २,७८२ कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षिततेच्या मंजुरीनंतर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत-पनवेल लोकल सेवेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.