अडचणींचा डोंगर पोखरून पनवेल-विरार रेल्वेमार्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

62 हेक्‍टर जमिनीची गरज; नऊ हजार कोटींचा खर्च
मुंबई - मुंबई महानगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल मार्गाच्या विस्तारात आणखी भर पडणार आहे. मुंबई नागरी वाहतूक टप्प्यात नसलेला पनवेल-दिवा-वसई-विरार या प्रस्तावित नऊ हजार कोटींच्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने मध्य व पश्‍चिम रेल्वेमार्ग जोडले जातील.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-3 चा (एमयूटीपी) भाग नसलेला पनवेल-दिवा-वसई-विरार हा 70 किलोमीटरचा प्रकल्प आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे राज्य सरकार मेट्रोचे जाळे कल्याणपर्यंत आणत असताना मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नव्या उपनगरी रेल्वेमार्गाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. हा प्रस्तावित मार्ग मध्य रेल्वेच्या पनवेल-दिवा-वसई रोड आणि पश्‍चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरारपर्यंत समांतर असेल. तरीही तब्बल 62 हेक्‍टर जमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला ताब्यात घ्यावी लागणार आहे. बांधकामाचा अवधी सात वर्षांचा असून 2023 पर्यंत हा मेगाप्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे.

कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला तर पुढील कार्यवाहीला वेग येईल. तूर्त आमचे बैठकीवर लक्ष आहे, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 24 डिसेंबरला मुंबई दौरा असून मेट्रो व मुंबई नागरी पायाभूत प्रकल्प-3 चे भूमिपूजन होईल. त्यावेळी या मार्गाविषयी घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

मार्गाची वैशिष्ट्ये
पनवेल-दिवा-वसई-विरार - 70 किलोमीटर
कारडेपोसाठी जमीन - 34.80 हेक्‍टर
रेल्वे मार्गासाठी - सरकारी 5.25 हेक्‍टर, खासगी 14.27 हेक्‍टर
स्थानकांसाठी - खासगी 5.55 हेक्‍टर, सरकारी 2.34 हेक्‍टर
पहिल्या वर्षांत 4 लाख 59 हजार प्रवासी अपेक्षित

अडचणी
कल्याण-डोंबिवली पालिका- निळजे-कोपर जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिनी
ठाणे पालिका- निळजे- जलवाहिनी
महानगर गॅस- पनवेल-विरारपर्यंत गॅसवाहिनी
महापारेषण व टॉरेंटो- कोपर-कामन आणि पनवेल-भिवंडी रोड- उच्च दाबाचे वीज टॉवर

Web Title: panvel-virar railway route