पेपर तपासणीतील चुकांबद्दल शिक्षकांना होणार दंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जुलै 2016

मुंबई - दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासताना चुका करणाऱ्या शिक्षकांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्येक चुकीबद्दल 10 रुपये दंड ठोठावला आहे. चुका करणाऱ्या शिक्षकांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
 
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनात अनेक विद्यार्थ्यांना थेट 17-18 गुणांची वाढ झाली आहे. परीक्षक, तसेच नियामकांच्या या चुकांमुळे विद्यार्थी-पालकांनी मंडळाविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत, असे मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन 100 टक्के बिनचूक होणे आवश्‍यक आहे. मंडळाची विश्‍वासार्हता त्यामुळे पणाला लागते. अशा चुका पुन्हा होऊ नयेत, म्हणून दंड आकारण्यात आला आहे, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

इयत्ता - बदललेले गुण - बदललेले निकाल
दहावी - 214 - 13
बारावी - 75 - 15

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज
दहावी : 3657
बारावी : 6972

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज
दहावी : 153
बारावी : 618

गुणपडताळणीसाठी अर्ज
दहावी : 843
बारावी : 1696 

Web Title: Paper checks will be fine teacher wrong