'त्या' ईमेलनंतर परमबीर सिंह यांचा फोन बंद, खात्याअंतर्गत चौकशीला सुरूवात?

'त्या' ईमेलनंतर परमबीर सिंह यांचा फोन बंद, खात्याअंतर्गत चौकशीला सुरूवात?

मुंबई: गृहरक्षक दलाचे कमांडर जनरल परमबीर सिंह यांच्या एका लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे.परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यानं गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. आता परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांची सरकार दरबारी दखल घेण्यात आली आहे. 

परमबीर यांच्या आरोपानंतर खाते अंतर्गत चौकशीला सुरूवात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परमबीर यांनी पाठवलेल्या मेलबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसंच माजी पोलिस आयुक्तांनी केलेल्या आरोपपत्रात परमबीर यांची स्वाक्षरी नाही आहे. त्यामुळे या ईमेलचा पत्ता तपासला जाणार आहे. परमबीर सिंह यांचा फोन बंद येत असल्याने गृहविभागाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे. 

 परमबीर यांचा अधिकृत ईमेल आयडी आणि प्राप्त झालेल्या मेलच्या ईमेल आयडीत  तफावत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयानंही ईमेल आयडी तपासून घेण्याचे आदेश दिलेत. 

खरंच गृहमंत्र्यांनी असे आदेश संबधित अधिकाऱ्यांना बोलावून दिले होते का? हे देखील तपासण्यात येणार आहे. त्यानुसार त्या दोन बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अधिकारी परमबीर यांच्या जवळचे असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर खळबळ माजली आहे. 

तसंच संबधित आरोपांबात नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावणार असल्याचंही समजतंय. या गंभीर आरोपानंतर मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Param bir Singh phone Switch off internal investigation started Department

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com