अखेर परमबीर सिंह यांचा पत्ता समजला

त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत, त्याच्या तपासामध्ये ते सहकार्य करतील.
Param Bir singh
Param Bir singhGoogle

मुंबई: काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former mumbai police chief) परमबीर सिंह (Parambir singh) कुठे आहेत? अशी चर्चा सुरु आहे. अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये (Chandigarh) आहेत. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत, त्याच्या तपासामध्ये ते सहकार्य करतील. स्वत: परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात माहिती दिली होती. ४८ तासात सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहेत असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.

Param Bir singh
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका? फडणवीसांनी बोलावली भाजपा नगरसेवकांची बैठक

परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीन कोर्टात सांगण्यात आले होते. परमबीर सिंह कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. परमबीर सिंह चंदीगड येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.

Param Bir singh
ST STRIKE: कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव

परमबीर सिंह देशात किंवा अन्य कुठे आहेत, ते समजल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेऊ असे १८ नोव्हेंबरला न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केलं होतं. आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तो पर्यंत कुठलीही सुनावणी होणार नाही, संरक्षण मिळणार नाही, असे खंडपीठाने परमबीर सिंह यांच्या वकिलांना सांगितले होते.

बिमल अग्रवाल यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दोन हॉटेल्सविरोधात कारवाई करण्याची धमकी देऊन आपल्याकडून ११.९२ लाख रुपये उकळले, असा आरोप केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com