ST STRIKE: कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

ST STRIKE: कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St strike) सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पगारवाढीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जो अहवाल देईल, तो सरकार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Register now : बीटेकमध्ये करिअरच्या संधी; २६ नोव्हेंबरला वेबिनार

थोड्याचवेळात परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रस्तावा संदर्भात माहिती देतील. त्यानंतर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद होईल.

हेही वाचा: 'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया

या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे. म्हणजे महिन्याला ५० कोटीचा भार पडणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावामुळे एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ मिळू शकते.

loading image
go to top