परमबीर सिंह व शिवसेनेचे साटेलोटे आहे; अतुल भातखळकरांचा आरोप | Atul Bhatkhalkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atul bhatkhalkar

परमबीर सिंह व शिवसेनेचे साटेलोटे आहे; अतुल भातखळकरांचा आरोप

sakal_logo
By
- कृष्ण जोशी

मुंबई : परमबीर सिंह (Parambir singh) यांच्याविरोधात राज्य सरकारने (mva government) दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी (criminal investigation) राज्याचे पोलीस अधिकारीच (Police authorities) मदत करत नसल्याचे सरकारी वकिलांनीच (Government lawyers) न्यायालयात सांगितल्याने परमबीर सिंह व शिवसेनेचे साटेलोटे (shivsena) आहे, हे सिद्ध झाल्याचा दावा भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे मेट्रो 3 च्या खर्चात वाढ; 108 कोटींनी वाढला खर्च

परमबीर सिंह यांना परदेशी पळण्यास केंद्र सरकारने मदत केली, असा खोटा आरोप करणारे काँग्रेसनेते आता कोठे गेले, असाही प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे. परमबीर व शिवसेना यांचे साटेलोटे असल्याचा आरोप आपण पहिल्यापासून करीत होतो, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. या अनिल वर आरोप केले तरी आमच्या अनिल वर आरोप करू नको, अशा स्वरुपाचे ते साटेलोटे होते, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर ते तब्बल 261 दिवस फरार होते. तरीही त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही ? त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने का केली नाही ? परमवीर सिंह यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही ? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही ? याचे कारण म्हणजे ‘त्या अनिल वर आरोप केले तर केलेस, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही‘, अशा प्रकारे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप‘ संवादातून शिवसेनेने हे सर्व नाटक चालविले आहे, असाही आरोप भातखळकर यांनी केला.

हेही वाचा: 'या' प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांना हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा

परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेता त्याची निःपक्ष चौकशी व्हावी याकरिता तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणीही भातखळकर यांनी यावेळी केली. परमवीर सिंह यांना परदेशी पळून जाण्यात व फरार करण्यात केंद्र सरकारने मदत केली असा खोटा आरोप काँग्रेसनेत्यांनी केला होता. परंतु परमबीर सिंह हे इतके दिवस भारतातच होते व काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्याच्या राजधानीत चंदिगड मध्ये होते हे आता सिद्ध झाले आहे.

एकीकडे आपण ज्या पक्षासोबत सत्तेत भागीदार आहोत तोच पक्ष परमबीर सिंह यांना वाचवित होता हे माहीत असताना सुध्दा त्याबद्दल चकार शब्द काढत नाही. आणि दुसरीकडे मात्र मोदी द्वेषातून केंद्र सरकारवर खोटे आरोप करायचे हा काँग्रेसचा ढोंगीपणा आता उघड झाला असल्याची टीकाही भातखळकर यांनी यावेळी केली.

loading image
go to top